💧 आश्वासनाची पूर्तता; सामाजिक कार्यकर्ते अक्षय भैय्या यांच्या पुढाकाराने तारापूर, नाला व सुरली गावठाण परिसरातील पाणीटंचाईवर दिलासा
मुख्य संपादक राम गायकवाड
पंढरपूर तालुक्यातील मौजे तारापूर येथील
गेल्या दोन महिन्यांपासून तारापूर, नाला तसेच सुरली गावठाण परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी पायपीट करावी लागत होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अक्षय भैय्या भुई यांनी स्वतःच्या खर्चातून बोरवेल खोदून देण्याचे आश्वासन दिले होते.
दिलेला शब्द पाळत आज अक्षय भैय्या भुई यांनी स्वतःच्या आर्थिक मदतीतून तारापूर, नाला व सुरली गावठाण येथे बोरवेलचे काम पूर्ण केले. विशेष म्हणजे, खोदलेल्या बोरवेलला मुबलक पाणी लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या उपक्रमामुळे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी होणारी नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. स्वतःच्या पैशातून लोकहिताचे कार्य करून अक्षय भैय्या यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांनी अक्षय भैय्या यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या या लोकहिताच्या कार्याचे कौतुक केले. “दिलेला शब्द पाळणारा लोकाभिमुख कार्यकर्ता” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवा करणाऱ्या अक्षय भैय्या भुई यांच्या या कार्यामुळे परिसरात त्यांच्याविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
