इंदापूर प्रतिनिधी: विठ्ठल काळे ही घटना इंदापूर बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर शेळगाव पाटी (ता. इंदापूर) येथील शिरसाटवाडी हद्दीत शुक्रवारी (दि.9 )सकाळी घडली. या भीषण अपघातात प्रतीक विशाल हागारे (वय 20, रा. हागारेवाडी, ता. इंदापूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.वालचंद नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता प्रतीक हगारे हा पुणे मार्केट मधून तरकारी खाली करून मिनी टेम्पो ने (एम एच 42 बी एफ 8897) बारामतीकडून इंदापूर कडे येत होता. तो शिरसाटवाडी गावच्या हद्दीत पुलावर समोरून येणाऱ्या ट्रक (एम एच 16 सीडी 8000) ला भरधाव वेगात धडकला या अपघातात प्रतीच्या डोक्याला, पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने

घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रकचालक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भवानीनगर_ इंदापूर दरम्यानचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले आहे. अर्धवट कामाच्या ठिकाणी ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतेही दिशादर्शक फलक लावले गेलेले नाहीत. शेळगाव पाटी येथे झालेल्या अपघाताच्या ठिकाणीही रस्त्याची आणि पुलाचे काम अपूर्ण आहे. तिथे कोणताही सूचनाफलक नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात वारंवार होत आहेत.वालचंद नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी सचिन रामहरी हागारे यांनी फिर्याद दिली आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार दादासाहेब डोईफोडे करत आहेत.मृत प्रतीक हगारे हा अवघ्या 20 वर्षाचा असून तो एकुलता एक मुलगा होता त्याच्यामागे आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे या अपघाती निधनाने हागारेवाङी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र व्यक्त होत आहे.
