अतिरिक्त पदावर सात वर्षे कशासाठी? कृषिमंत्र्याच्या गावचा अजब कारभार

 

इंदापूर प्रतिनिधी: विठ्ठल काळे:अतिरिक्त पदावर सात वर्षे कशासाठी? या ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर कारवाई का नाही.सात वर्षे पेक्षा जास्त कालावधी अतिरिक्त पदावर काम करण्याचे गौड बंगाल अजून लोकांना उमगले नाही. त्यात ठराविक समर्थकांचा गट बनवून तक्रारदारांना धमकावणे तसेच ग्रामसभेत गोंधळ घालायला लावणे, कामात अनियमितता ठेवणे, लोकांनी मागितलेली कागदपत्रे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे यामुळे वादग्रस्त असणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई का होत नाही.

ग्रामपंचायत अंथुर्णे येथील ग्रामपंचायत अधिकाराच्या अतिरिक्त चार्ज काढून नवीन ग्रामपंचायत अधिकारी यांची नियुक्ती झाली होती त्यांच्या नियुक्त बाबत आदेशाची माहिती गट विकास अधिकारी यांना मागितलेले होती त्यानुसार नवीन ग्रामपंचायत अधिकारी अमोल भोसले यांना चार्ज न देता अतिरिक्त ग्रामपंचायत अधिकारी दीपक भोसले हे चार्ज न सोडता बेकायदेशीरपणे काम करत असल्याचे गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही लेखी व तोंडी आदेश नसतानाही जाणीवपूर्वक अतिरिक्त ग्रामसेवकच काम करत असल्याने त्यांची तक्रार जिल्हा परिषद पुणे यांना दिली होती. तरीही अंथुरणे ग्रामपंचायत अधिकारी जवळपास सात वर्षापासून अतिरिक्त कार्यभार अंथुर्णे या गावांमध्ये बघत आहेत परंतु त्यांची नियुक्ती ही गोतंडी या गावांमध्ये आहे सध्या जिल्हा परिषदेने चार्ज सोडण्याबाबत पत्र दिले असताना व गटविकास अधिकारी यांना सदरील चार्ज सोडल्यानंतर प्रति टपाली अहवाल पाठवण्याबाबत सांगितले होते. परंतु गट विकास अधिकारी यांनी दीपक भोसले यांना चार्ज सोडण्याचे पत्र देऊनही चार्ज सोडला नाही संबंधित जिल्हा परिषद व गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला डावलून अतिरिक्त काढणे रद्द करणे बाबत अर्ज केला होता. ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या बदली रद्द करण्याच्या अर्जाला मान्यता देऊन गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशाचा अवमान केला आहे

 

 

गटविकास अधिकारी यांची कारवाही व्हावी अशी मागणी व पाठपुरावा सातत्याने जिल्हा परिषद कार्यालयाचा बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा सचिव विजय जगताप युवा नेते (बीएसपी) चेतन थोरात व बहुजन समाज पार्टी इंदापूर कोषाध्यक्ष आकाश वाघमारे यांच्याकडून सुरू आहे. अंथुर्णे या गावांमध्ये बघत आहेत परंतु त्यांची नियुक्ती ही गोतंडी या गावांमध्ये आहे सध्या जिल्हा परिषदेने चार्ज सोडण्याबाबत पत्र दिले असताना व गटविकास अधिकारी यांना सदरील चार्ज सोडल्यानंतर प्रति टपाली अहवाल पाठवण्याबाबत सांगितले होते. परंतु गट विकास अधिकारी यांनी दीपक भोसले यांना चार्ज सोडण्याचे पत्र देऊनही चार्ज सोडला नाही संबंधित जिल्हा परिषद व गट विकास अधिकारी यांच्या आदेशाला डावलून अतिरिक्त काढणे रद्द करणे बाबत अर्ज केला होता. ग्रामपंचायत अधिकारी त्यांच्या बदली रद्द करण्याच्या अर्जाला मान्यता देऊन गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषद प्रशासनाच्या आदेशाचा अवमान केला आहे.अशा या अधिकाऱ्याच्या डोक्यावरती कोणा एका पुढाऱ्याचा तरी हात नाही ना, अशी शंका प्रत्येकाच्या मनात रुजलेली आहे. म्हणूनच या लोकांना आपलेच लोक खतपाणी घालतात त्यामुळे आपण कामावरती ठेवलेला कामगार हा आपला मालक होतो.

सात वर्षापेक्षा जास्त कालावधी अतिरिक्त कार्यभार करतानाच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे व त्यांना गटविकास अधिकारी मदत करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सदरील गटविकास अधिकारी शासनाच्या नियमाप्रमाणे काम करीत नसल्याने त्यांच्या या मनमानी आणि नियमबाह्य कारभारा विरोधात आम्ही लवकरच जिल्हा परिषद पुणे यांचे कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहोत.

जोपर्यंत सचिन खुडे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहीलअंथुर्णे गावच्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना काम करून न देण्याचा ठराव मुद्दाम ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घेतला नाही. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेण्यास अर्जही दिला होता परंतु अर्ज देऊनही ग्रामसभा घेतली नाही. ग्रामसभा न घेणे म्हणजे ग्रामस्थांच्या हक्काचा आणि लोकशाहीचा गळा घोटणे आहे ग्रामसभा न घेतल्याने जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहे. असा सज्जड इशारा चेतन युवराज थोरात युवा नेते बहुजन समाज पार्टी आणि बहुजन समाज पार्टीचे इंदापूर कोषाध्यक्ष आकाश संतोष वाघमारे यांनी केली आहे.गटविकास अधिकारी यांची कारवाही केली व्हावी अशी मागणी व पाठपुरावा सातत्याने जिल्हा परिषद कार्यालयाचा बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा सचिव विजय जगताप युवा नेते (बीएसपी) चेतन थोरात व बहुजन समाज पार्टी इंदापूर कोषाध्यक्ष आकाश वाघमारे यांच्याकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!