सोलापूर प्रतिनिधी:सोलापूर लोकसभेच्या कर्तव्यदक्ष खासदार मा. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमनगर अनवली (ता. पंढरपूर) येथील अतिवृष्टीग्रस्त 26 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात श्री संदीप पाटील (अध्यक्ष, पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटी), श्री वल्लभ घोडके (सरपंच, अनवली), तसेच श्री अमोल भोसले, लखन सूर्यवंशी, तोफिक शेख, बिरुदेव कोकरे, कैलास भोसले आणि मल्हारी फाळके उपस्थित होते.

भरपूर पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घेत, उपस्थित मान्यवरांनी अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून प्रभावित कुटुंबीयांना दिलासा दिला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना तात्काळ मदत मिळाल्याबद्दल गावकऱ्यांनी कौतुक व्यक्त केले.
