माढा नगर पंचायत प्रशासन झोपेतून जागे, भारतीय दलित पॅंथर

 

माढा प्रतिनिधी:नगर पंचायतीतील सफाई कामगार हे गेल्या दोन महिन्यांपासून पगाराविना काम करत होते. झाडू मारणे, गटार साफ करणे, कचरा गोळा करणे अशी अत्यंत कठीण आणि आरोग्याला धोकादायक कामे करणाऱ्या या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणातसुद्धा आपल्या घरासाठी गोडधोड करणे किंवा मुलाबाळांना नवीन कपडे घेणे अशक्य झाले होते.दिवाळी तोंडावर असताना कर्मचाऱ्यांनी नगर पंचायत कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे पगार करण्याची विनंती केली असता, “आर्थिक परिस्थितीमुळे पगार देता येणार नाही” असा थंड प्रतिसाद देण्यात आला. शासन यंत्रणा व प्रशासनाची ही उदासीन भूमिका पाहून कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

या गोरगरीब, मागासवर्गीय व सर्वसामान्य सफाई कामगारांच्या व्यथा भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शरद धर्मा भांगे यांच्या पर्यंत पोहोचल्या. त्यांनी तत्काळ ही बाब प्रा. अंबादास सैदू शिंदे (पत्रकार, लेखक व संस्थापक अध्यक्ष – भारतीय दलित पँथर, महाराष्ट्र राज्य, पुणे) यांच्या निदर्शनास आणून दिली.प्रा. शिंदे सरांनी तात्काळ मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांना लेखी स्वरूपात तसेच व्हॉट्सअॅपद्वारे निवेदन पाठवून नगर पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र शब्दात निषेध नोंदवला. त्यांच्या या ठाम भूमिकेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी एका महिन्याचा पगार संबंधित सफाई कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आला, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

तरीसुद्धा अजूनही एक महिन्याचा पगार थकीत आहे. कामगार वर्गाने आता शासनाकडे व नगर पंचायत प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की  दिवाळीपूर्वी सर्व थकीत पगार तात्काळ अदा करावेत, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

 

 

प्रा. शिंदे सरांच्या पुढाकारामुळे आणि दलित पँथर संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला जाग आली, ही बाब कौतुकास्पद असली तरी प्रशासनाने पुढे अशा घटना घडू नयेत, कामगारांचा सन्मान राखावा आणि त्यांच्या हक्काचा पगार वेळेत द्यावा, हीच जनतेची अपेक्षा आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *