सोलापूर प्रतिनिधी – दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सह.संपादक.
मंगळवेढा – भैरवनाथ शुगर (लवंगी) या कारखान्याने २०२४-२५ हंगामात ऊस भरती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात साखर वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
या योजनेअंतर्गत मंगळवेढा, बूऱळे, मरवडे, हुनूर, बेगमपूर, गोपाळपूर, तसेच टाकळी सिंकदर, सांगोला, कंदलगाव, अडचण इंडी, उमदी, संख, बोरगी अशा गट कार्यालयांमार्फत साखर वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळा मंगळवेढ्यातील भैरवनाथ शुगरच्या शेती विभागीय कार्यालयात झाला. यावेळी मुख्य शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे, कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी, व मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
भैरवनाथ शुगर प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना विविध सवलती आणि सुविधा पुरवित येत असून, यंदाही शेतकऱ्यांचा सन्मान राखत साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला आहे. शेतकऱ्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
