जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरा मध्ये करतील, भारतीय दलित पॅंथर संघटना

फलटण,डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे.एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे डॉ.संपदा मुंडे.

चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा मुंडे वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा मुंडे कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होत्या.

त्या अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकट्या लढत होत्या.

 

पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन त्यांची संस्थात्मक हत्या करण्यात आलेली आहे.

 

आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा मुंडे करतील..

 

अंबादास सैदु शिंदे संस्थापक अध्यक्ष :भारतीय दलित पँथर महाराष्ट्र राज्य पुणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *