सोलापूर,सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा पुन्हा सुरू — भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सत्कार,

संपादक ,राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.

सोलापूर,मोहोळ, ता. १ नोव्हेंबर —कोरोना काळापासून बंद पडलेला सिद्धेश्वर एक्सप्रेसचा मोहोळ रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू झाल्याने मोहोळ तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यासाठी विशेष प्रयत्न करणारे भाजपा राज्यसभा खासदार मा. धनंजय महाडिक साहेब यांची मोहोळ तालुक्यातील नागरिक व चेंबर ऑफ कॉमर्स, मोहोळ यांच्या वतीने भेट घेऊन सत्कार व मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

 

 

या प्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस व चेन्नई मेल या गाड्यांचा मोहोळ स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांना शिफारसपत्र देण्याबाबत निवेदन खासदार महाडिक साहेबांना सादर करण्यात आले.

महाडिक साहेबांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

 

मोहोळ शहर हे विस्तृत बाजारपेठ असलेले महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. तालुक्याची लोकसंख्या सुमारे 2.5 लाख, तर तीन राष्ट्रीय महामार्ग मोहोळ शहरातून जातात. तसेच चिंचोली व चंद्रमौळी इंडस्ट्रियल इस्टेट हे मोठे औद्योगिक पट्टे येथे आहेत. तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी पुण्याकडे, तसेच व्यापारी व विद्यार्थी पुणे-सोलापूर शहरांकडे प्रवास करतात.

 

तसेच मोहोळ परिसरात श्री क्षेत्र वडवळ, श्री क्षेत्र मोहोळ आणि पंढरपूर ही महत्त्वाची धार्मिक स्थळे असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात भक्तांची ये-जा असते. या सर्व पार्श्वभूमीवर वरील रेल्वे गाड्यांचे थांबे मोहोळ येथे कायमस्वरूपी मंजूर झाल्यास व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होईल.

 

 

 

या भेटीत चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मा. प्रवीण नाना डोके, भाजपा नेते सोमेश (आबा) क्षीरसागर, मा. हरिश्चंद्र बावकर, मा. महेश आंडगे, मा. रविकिरण कोरे, मा. अतुल गावडे, मा. नागेश पुराणिक, मा. नैईमुद्दीन शेख, मा. सचिन कवठे, मा. बाळासाहेब क्षीरसागर, मा. उमरभाई शेख तसेच चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *