मोहोळ तालुक्यातील,पापरी शाळेचा अभिमान! मानसी आनंद माळी हिला जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा मान. 

 

सोलापूर, प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.मोहोळ तालुक्यातील मौजे पापरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी मानसी आनंद माळी (इ. 7 वी) हिने सोलापूर जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा (STS) 2025 मध्ये मुलींच्या गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. 

 

या उल्लेखनीय यशामुळे पापरी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

 

मानसीचा सन्मान आगामी कार्तिकी एकादशीच्या महापूजेमध्ये मा. उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात मानसीला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा विशेष मान मिळणार असून तिच्या कर्तृत्वाचा गौरव संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होत आहे.

 

 

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ यांनी मानसीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

मानसीच्या या यशामुळे पापरी गावाचा आणि मोहोळ तालुक्याचा मान अभिमानाने उंचावला आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *