मोहोळ मतदारसंघातील विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन. माजी आमदार राजन पाटील

मोहोळ मतदारसंघातील विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन…

सोलापूर,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज मुंबई येथे भेट घेऊन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे साहेब, मा. आ. श्री. राजनजी पाटील साहेब आणि मा. आ. श्री. यशवंत (तात्या) माने साहेब यांनी मोहोळ मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले.

 

 

या भेटीदरम्यान मोहोळ मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण संस्था आणि ग्रामविकासाशी संबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सादर केलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 

या बैठकीमुळे मोहोळ तालुक्यातील विकासकामांना नवे बळ मिळणार असून, नागरिकांच्या अपेक्षांना न्याय मिळेल, असा विश्वास स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *