पंढरपूर(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आणि जागोजागी निवडणूकीचे पडघम वाजु लागले. पंढरपूर तालुक्यातील रोपळे जि.प.गटाची जागा अनुसूचित जाती (महिला) या प्रवर्गासाठी झालेली असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या भागात समाजकार्यात अग्रेसर असणारे आशोक पाटोळे यांचे पत्नी सौ.उषा पाटोळे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी चर्चा मतदांरांमधुन होत आहे.
रोपळे जिल्हा परिषद गट क्रमांक ३१ अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव असल्याने या गटामधून समाजसेवक अशोक रामचंद्र पाटोळे हे जनतेच्या अडचणी सोडवुन जनाधार मिळवलेले व्यक्तीमत्व आहे. या भागात घरकुलाचे प्रश्न असतील घरकुल साठी जागेचे प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न, पशुसंवर्धन गाईचे प्रकरण, प्रश्न असतील शेळ्या-मेंढी प्रकरण, महिलांना शिलाई मशीन प्रकरणासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याने या गटात त्यांचा मतदारांचा दांडगा संपर्क असल्याने भविष्यात निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांची पत्नी सौ.उषा पाटोळे यांना निवडणुकीत उतरवावे अशी चर्चा मतदारांमधुन सुरू आहे.
रोपळे जि.प. गटांतर्गत लोकाभिमुख चेहरा आणि शेतकर्यांसाठी कायम पाठीशी उभा राहणारा अशीही आशोक पाटोळे यांची ओळख असुन स्थानिक पातळीवर वरीष्ठ नेतेमंडळींशी सलोख्याचे संबंधामुळे सौ. पाटोळे यांना संधी मिळण्याची संधी नाकारता येणार नसुन पंढरपूर तालुक्यातील शेतकर्यांकरीता महत्त्वपूर्ण विकासाभिमुख शासकीय योजना राबविण्यासाठी आशोक पाटोळे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यामध्ये त्यांची महत्वाची भुमिका आहे. त्यांचे पत्नी मागील रोपळे पंचायत समिती गणातुनही निवडणूक लढविली असल्याने मतदारांमधुन पुन्हा एकवेळ सौ. पाटोळे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी मागणी होत आहे.

रोपळे गटात विकासाभिमुख कामे राबविण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार असुन संधी दिल्यास रोपळे जि.प. गटाचा सर्वांगीण विकास ते करतील अशी चर्चा मतदारांमधुन होत आहे. युवकांना अर्थिक सक्षम करणे ,लघु ऊद्योगास शासकीय योजना मिळवून देणे यासारखी कामे पाटोळे यांनी केली आहेत. त्यामुळे सौ. पाटोळे यांना उमेदवारी मिळाल्यास स्वच्छ व पारदर्शी सौ. उषाताई पाटोळे यांचे लोकप्रिय नेतृत्व यामुळे रोपळे जी. प. गटात विक्रमी विजय शक्य मानला जात आहे.
