पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुक्याचे राजकारणात एकेकाळचे खास मित्र आणि काही वर्षांपासूनचे राजकीय हाडवैरी यांनी एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्या समोर ठेवत मैत्रीची तार छेडली आहे. विशेष म्हणजे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन माढा विधानसभेचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी पांडुरंग परिवारास टक्कर देण्यासाठी विठ्ठल परिवार व विठ्ठल प्रतिष्ठान एकसंघ रहावा यासाठी नुकतेच कल्याणराव काळे यांचे कार्यालयास सदिच्छा भेट देत काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षाच्या स्थानिक पुढाऱ्याशी चर्चा केली असली तरी या बैठकीस पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नागेश भोसले तसेच तालुक्यातील अनेक मान्यवरानी पाठ फिरवली असल्याने जनतेसमोर तिसरा पर्याय नागेश काका भोसले ठेवणार असल्याची चर्चा रंगत आहे.
सध्या पंढरपूरातील राजकिय घडामोडींची चर्चा जोरात सुरू असुन यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी राजकारणाच्या नादातआपल्या घराची संसाराची राखरांगोळी केलेली आहे. अश्या निष्ठावंतांना न्याय मिळणार का?? सतत व्यवहारी राहिलेल्या नेत्यांचे ठीक असते; पण आयुष्य वाहून घेतलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे हाल वाईट. म्हणून ते नागेश काका चा तिसरा पर्याय निवडणार ते वेळ च सांगेल कार्यकर्त्याची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे त्यांना आपण कोणासाठी आणि कशासाठी जीवाचा आटापिटा करतो, हे समजेपर्यंत वय त्यांचे निघून जाते. कोणाची पालखी वाहतो ते समजत नाही. कोण कसा वापर करतो ते उमगत नाही. जरी कळले, तरी वेळ गेलेली असते. नंतर डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय उरत नसतो. असे पश्चाताप झालेले हजारो कार्यकर्ते आज पंढरपूर शहरात आहेत.ते नागेश काका च्या रूपाने त्यांना संधी न्याय मिळणार का???
कोणाचा झेंडा मिरवायचा, कोणाचा प्रचार करायचा, अशा संभ्रमात दोन पिढ्यांची बरबादी झाली. सतरंज्या उचलण्यावारी घरदार आणि संसाराची राखरांगोळी केलेली ही मंडळी आता चर्चेचा विषय आहे. असेच होत राहिले, तर राजकारण हे समाजसेवेचे माध्यम आहे यावरचा जनतेचा विश्वास उडेल. चांगले कार्यकर्ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, काँग्रेस मनसे ये सब घोडे बारा टक्के. हे बदलायचे असेल, तर निष्ठावंतांची कदर केली पाहिजे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. सेवेचा मोबदला म्हणून निष्ठावंत कार्यकरत्यांना संधी मिळाले पाहिजे; अन्यथा राजकारण ही एक बाजारपेठ होईल. हे बदलायचे असेल तर जे प्रामाणिक आहेत, “कार्यकर्ता’ या व्याख्येत बसतात, समाजाची सतत काळजी वाहतात, असेच लोक सभागृहात आले पाहिजेत. भले ते फाटके असोत, त्यांच्या सच्चाईची कदर केली पाहिजे.
शहराच्या राजकारणात कार्यकर्ते सडले गेले आहेत. राजकारणात एकमेकांच्या विरोधात गळा ताणून बोलणारे नेते आज गळ्यात गळे घालून मिठ्या मारतात. मात्र, त्यांच्यासाठी ज्यांनी दोन हात केले त्या कार्यकर्त्यांचे मन काय म्हणत असेल, ते देव जाणो. काल राष्ट्रवादीत होते, तेच आज भाजपमध्ये आहेत. भाजपचे निष्ठावंत ज्यांच्या विरोधात भांडले त्याच नेत्यांच्या पालख्या उचलण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. सर्व पक्षांत हाच सावळागोंधळ आहे. एकीकडे शहरातील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी भाजपाचे मंडळींनी हायजॅक केली, कोण कोणाविरुद्ध का बोलतो, याला काहीही अर्थ नाही. नेत्यांनी तत्त्व, निष्ठा यांना तिलांजली दिल्याने आता कार्यकर्ते दोन पावले पुढे आहेत. त्यांनीही कंबर कसली आणि विचार आचाराशी सुसंगत नसलेल्यांशी ते संग करू लागले. इतके भरकटलेले आहे. त्यामुळे नागेश काका भोसले हे या सर्वांचे तारण हार ठरणार का हे येणारी वेळच ठरवेल
