कोल्हापूर महानगरपालिका,प्रभाग १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे

प्रभाग १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे यांची इच्छुक  उमेदवारी ,

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) –  कोल्हापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधून समाजसेविका सौ. पंचशील चंद्रकांत साळवे यांनी आपली नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारी  आहे.

सौ. साळवे या पश्चिम महाराष्ट्र इन्स्पेक्टर निरीक्षक संघटनेच्या अध्यक्ष असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत त्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

 

 

 

स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “माझे ध्येय म्हणजे प्रभाग क्रमांक १७ चा सर्वांगीण विकास आणि महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविणे.”

प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते आणि महिला वर्गाकडून सौ. साळवे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *