किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर बालदिन उत्साहात साजरा 

किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर बालदिन उत्साहात साजरा

पंढरपूर प्रतिनिधी,: दि.14/11/2025,श्री दर्लिंग विद्या मंदिर व किशोर निर्मळ इंग्लिश मीडियम स्कूल तारापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमास प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सागर नारायण निर्मळ सर यांनी नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली . बालदिनानिमित्त प्रशालेमध्ये भाषण, नृत्य ,नाटक ,प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. चाचा नेहरूंची आवडती टोपी व गुलाबाचे फुल विद्यार्थ्यांना बनवून आणण्यास सांगितले होते. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे बनवून आणले होते त्यांना बक्षीस देण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमांमध्ये प्रत्येक वर्गातून ज्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त प्रश्नाची उत्तरे दिली त्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला यामध्ये हलगी वादन करणाऱ्या विद्यार्थ्यालाही बक्षीस देण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला संस्थापकांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी विशेष लक्ष वेधले ते विद्यार्थ्यांचे आवडते कार्टून मिकी माऊस ने.

 

 

बाल दिनानिमित्त प्रशालेमध्ये खाऊ वाटप करण्यात आला. मा . श्री सज्जन भोसले या पालकाने मुलांना केळी वाटप करून शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमास प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सागर निर्मळ सर , मुख्याध्यापक सौ प्रवीना कदम ,मुख्याध्यापक सौ शताक्षी माने तसेच शिक्षक वृंद सौ स्वाती गुळभिले मॅडम , सौ उषःकिरण चव्हाण मॅडम , सौ संध्या आसबे मॅडम , सौ ऐश्वर्या पवार मॅडम , सौ अंजली साठे मॅडम , सौ सारिका चव्हाण मॅडम , सौ सोनी ओव्हाळ मॅडम , सौ तृप्ती डोंगरे मॅडम , सौ कविता शिंदे मॅडम , श्री सोहेल तांबोळी सर, शाळेचे क्लर्क श्री राम बंडगर सर उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *