सोलापूर, प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप,संविधान न्यूज सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पासून अंकोली गावात कुष्ठरोग तपासणीसाठी विशेष पाहणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाकडून नियुक्त पथक गावातील नागरिकांची घराघरांत जाऊन तपासणी करत आहे.
या विशेष मोहिमेत आशा वर्कर कामतकर मॅडम, करिष्मा मुजावर, डाटा कलेक्टर सौ. अडसूळ {माने} मॅडम यांनी सहभाग घेत सक्रियपणे सर्वेक्षणाचे काम पार पाडले. तसेच मधूकर आडसूळ व राजाराम सरवळे गुरुजी यांचीही प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्य स्थितीची माहिती घेतली.
आरोग्य केंद्राच्या सूचनेनुसार गावामध्ये कुष्ठरोगाबाबत जनजागृती, लवकर निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. गावकऱ्यांनीही पथकास सहकार्य करून तपासणीसाठी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आरोग्य विभागाने नागरिकांना कुष्ठरोग हा उपचारयोग्य असून भीती बाळगू नये, तसेच तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
