पंढरपूर नगरपरिषदेत परिचारक पॅटर्नच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग?
दोन्ही आमदारांच्या एकजुटीमुळे तालुक्यात चर्चांना उधाण…..
संपादक :पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे मागील चाळीस वर्षांपासून परिचर पॅटर्नची एकहाती सत्ता कायम आहे. नगरपरिषदेमध्ये दीर्घ काळापासून प्रभाव राखणाऱ्या या गटासमोर यंदाच्या निवडणूक वातावरणात नवीन आव्हान उभे राहिले आहे. सध्या परिचारक समर्थांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले असून, तालुक्यात याविषयी मोठी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
यंदाच्या निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील, आमदार भगीरथ भालके आणि नेते अनिल सावंत यांच्या सक्रियतेमुळे परिचर पॅटर्नच्या दशकांपासून चालत आलेल्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही आमदारांची एकजूट दिसत असल्याने परिचारक गटाची ‘पडझड’ होऊ शकते, अशी चर्चा जनतेतून ऐकू येत आहे.
राजकीय वर्तुळात याची तुलना माढा व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील घटनांशी केली जात आहे. माढा मतदारसंघातील माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्या एकहाती सत्तेला आमदार अभिजीत पाटील यांनी सुरुंग लावला होता. त्याचप्रमाणे मोहोळ मतदारसंघात आमदार राजू खरे यांनी राजन पाटील यांच्या 40 वर्षांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. याच धर्तीवर पंढरपूर नगरपरिषदेतही इतिहास बदलू शकतो का, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

![]()
सध्या पंढरपूर तालुक्यात या घडामोडींवर जोमदार चर्चा सुरू असून, दोन्ही आमदार एकत्र आल्यामुळे ‘परिचारक पॅटर्न’ची सत्ता ढासळण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
