💥कै. हरीभाऊ दादा सुरवसे यांच्या आठवणींवर आधारित “आधारवड” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी सकाळी 11वाजता भैरवनाथ मंदिर अंकोली येथे प्रसन्न…
सोलापूर,प्रतिनिधी:- दादासाहेब जगताप, सहसंपादक संविधान न्यूज चॅनल.
अंकोली व पंढरपूरसह सर्व नातेवाईकांमध्ये अत्यंत आदराचे स्थान असणारे कै. हरीभाऊ {दादा} सुरवसे यांच्या आठवणींवर आधारित “आधारवड” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवार, दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकळी ११वाजता, श्री भैरवनाथ मंदिर ,अंकोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असून,
सदर कार्यक्रमाचे प्रमुख —
मा.राजन पाटील (मालक), माजी आमदार.
कार्यक्रमाचे विशेषअतिथी—
मा. जे. के. बापू जाधव,
सदस्य – रयत शिक्षण संस्था, सातारा
सदस्य – कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली
प्रमुख पाहुणे —
मा. डॉ. संजीव पाटील,
चेअरमन – मध्य विभाग रयत शिक्षण संस्था, सातारा
कार्यक्रमाचे अध्यक्ष व संयोजक
मा. श्री बाबासाहेब तात्या क्षीरसागर
स्कूल कमिटी सदस्य अंकोली, माजी सभापती, पंचायत समिती मोहोळ
हे आहेत.
कै. हरीभाऊ प्रेमी, नातेवाईक, अंकोली गावातील सर्व नागरिक, तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

हा कार्यक्रम कर्मयोगीनी स्व. शालिनी हरीभाऊ सुरवसे प्रतिष्ठान, अंकोली–पंढरपूर यांच्या वतीने तसेच सर्व संस्था, स्कूल कमिटी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आह.
