दुर्दैवी अपघातात हमालाचा मृत्यू – कोल्हापूर परिसरात ट्रकची मागे घेताना घटना …

दुर्दैवी अपघातात हमालाचा मृत्यू – कोल्हापूर परिसरात ट्रकची मागे घेताना घटना …

 

प्रतिनिधी:कोल्हापूर परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात नितीन राजाभाऊ गायकवाड (मुळगाव: तारापूर तालुका पंढरपूर जिल्हा) यांचा जागीच मृत्यू झाला. उचगाव फुलापासून सर्विस रोडने पायी जात असताना मागे घेतलेल्या ट्रकचा धक्का बसून ते खाली कोसळले आणि ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा तरुणाचा अंत झाला.

 

 

 

घटनेची सविस्तर माहिती :

नितीन राजाभाऊ गायकवाड हे हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ते पत्नी व दोन मुलांसह उचगाव परिसरात भाड्याने राहत होते. आज ते नेहमीप्रमाणे कामावर गेले नव्हते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते उचगाव फुलाजवळून सर्विस रोडने पायी चालत जात होते.

 

याचवेळी ट्रक चालक चव्हाण हे ट्रक मागे घेत होते. बाजूने चालणाऱ्या नितीन गायकवाड यांना ट्रकचा धक्का बसला आणि ते खाली कोसळले. मागील चाक त्यांच्या छातीवरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

 

या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 

ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *