३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

🏅 अंकोली भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार — ३७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 🏅

 

सोलापूर,प्रतिनिधी : दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.

 

भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अंकोली येथे एनएमएमएस, इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

 

या वर्षी शाळेतील एकूण ३७ विद्यार्थी विविध शिष्यवृत्ती व पात्रता परीक्षांमध्ये यशस्वी झाले. त्यामध्ये

 

NMMS – 26 विद्यार्थी

 

इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती – 08 विद्यार्थी

 

इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती – 02 विद्यार्थी

 

नवोदय प्रवेश परीक्षा पात्र – 01 विद्यार्थी

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

🌸 कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती 🌸

 

कार्यक्रमाच्या सोहळ्यास उपस्थित असलेले मान्यवर :

 

संस्थेचे सल्लागार समितीचे चेअरमन आदरणीय संजीव पाटील साहेब

 

मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आदरणीय जे. के. बापू जाधव साहेब

 

विभागीय अधिकारी आदरणीय जगदाळे साहेब

 

शाळा कमिटी सदस्य बाबासाहेब (तात्या) क्षीरसागर

 

संग्राम (काका) पवार

 

सज्जन (भाऊ) पवार

 

माजी सरपंच संदीप (काका) पवार

 

 

त्यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

✨ उपस्थितांची संख्याबळ आणि उत्साह ✨

 

समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग यांचे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

श्री बा. बा. वाघमारे आणि सौ. मनिषा वाघमारे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *