पंढरपूर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी सामना रंगणार…….
मुख्य संपादक : राम गायकवाड, संविधान न्यूज चॅनल
पंढरपूर नगरपरिषद निवडणूक 2025 ला मिळत असून नगराध्यक्ष पदासाठी थेट सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सौ. श्यामल लक्ष्मण शिरसट या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून त्यांच्या विरोधात डॉ. प्रणिती भालके या देखील जोरदार तयारीसह निवडणुकीच्या मैदानात आहेत.

- शहरातील राजकीय वातावरण तापत असताना माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या मजबूत नेतृत्वाचा प्रभाव या निवडणुकीतही ठळकपणे जाणवत आहे. शिरसट यांचे शहरातील सर्व प्रभागांमध्ये लक्षणीय प्रभाव असून त्यांच्याप्रती असलेल्या विश्वासामुळे सौ. श्यामल शिरसट यांचे पारडे जड होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजप पक्षयंत्रणा, स्थानिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि अनेक प्रभागांमधील नागरिकांकडून शिरसट यांना मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संविधान न्यूज चॅनलतर्फे या निवडणुकीतील घडामोडींवर विशेष लक्ष ठेवून अद्ययावत माहिती आपणापर्यंत वेळोवेळी पोहोचवली जाईल.
