महावितरणाचा भोंगळ कारभार उघडकीस – सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांची आत्मदहनाची चेतावणी..
प्रतिनिधी,इंदापूर तालुक्यातील निरगुडे–भादलवाडी रस्ता येथे महावितरणच्या भोंगळ आणि बेफिकीर कारभारामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून या चुकीकडे PWD च्या स्पष्ट आदेशानंतरही महावितरणकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांनी केला आहे.
पीडब्ल्यूडीच्या नियमानुसार रस्त्याच्या मध्यभागापासून किमान 15 मीटर अंतरावर लाईटचा पोल असणे बंधनकारक आहे. याबाबतचे लेखी पत्र महावितरणकडे असतानाही निरगुडे–भादलवाडी मार्गावर वाकडेवस्तीकडे जाणारी 11 केव्ही लाईन रस्त्याच्या अगदी कडेला, साईड पट्ट्यावरच रोवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.


या निष्काळजीपणाविरोधात आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सामाजिक कार्यकर्ते भगवान बापू खारतोडे यांनी ऊर्जाभवनचे अधीक्षक अभियंता दीपक लहांगे यांना आत्मदहनाचे निवेदन दिले असून महावितरणच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला आहे.
ऊर्जा भवनातील संबंधित अधिकारी:
बोलणारे साहेब – सणसर
उपकार्यकारी अभियंता – जाधव साहेब
कार्यकारी अभियंता – सोलवणकर साहेब
या अधिकाऱ्यांनी PWD चे 15 मीटर अंतराचे स्पष्ट आदेश असूनही त्याकडे केराची टोपली दाखविल्याचा आरोप खारतोडे यांनी केला आहे.
यातून महावितरणची मनमानी, बेफिकिरी आणि गुंडागिरीसारखी वागणूक उघड होत असल्याचे ते म्हणाले.
स्थलस्थितीचे पुरावे म्हणून प्रतिमा (124) देखील त्यांनी सादर केली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्काळ कारवाई करावी, असे त्यांनी शासनाला आणि संबंधित विभागाला आवाहन केले आहे
