नगरपरिषदेत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवून पंढरपूरच्या विकासाला नवे बळ देऊया

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक 2025 : समाधान अवताडे यांच्या प्रवेशाने भाजपा प्रचाराला वेग…

मुख्य संपादक, राम गायकवाड 

 

पंढरपूर – पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रचार शुभारंभवेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान दादा अवताडे अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच प्रसारमाध्यमांत विविध चर्चांना उधाण आले होते. “समाधान अवताडे गैरहजर का?” अशा विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊन एकच खळबळ माजली होती.

 

मात्र आता आमदार समाधान अवताडे यांनी स्वतः प्रचार दौऱ्यात सक्रीय सहभाग नोंदविल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले असून प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये झालेल्या त्यांच्या प्रचार दौऱ्यात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

 

 

पत्रकारांशी बोलताना आमदार अवताडे म्हणाले,

“सौ. श्यामल शिरसट यांच्या नेतृत्वाखाली सर्व भाजपा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नगरपरिषदेत पुन्हा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवून पंढरपूरच्या विकासाला नवे बळ देऊया.”

 

त्यांच्या उपस्थितीमुळे भाजपा उमेदवारांचा उत्साह दुणावला असून पुढील काही दिवसांमध्ये प्रचार अधिक गतीमान होणार असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *