तारापूर गावचे युवा नेते व माजी सरपंच, शरद नागरी सहकारी बँकचे संचालक
श्री प्रदीप दादा निर्मळ यांच्या वाढदिवस व संविधान दिनानिमित्त सामाजिक उपक्रम
पंढरपूर तालुक्यातील,:आज रोजी तारापूर गावचे युवा नेते, माजी सरपंच व शरद नागरी सहकारी बँकचे संचालक श्री प्रदीप दादा निर्मळ यांच्या वाढदिवस तसेच संविधान दिन या दुहेरी औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरली गावठाण येथे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच खाऊ वाटप करून वाढदिवस व संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रणजीत जगताप यांच्या प्रस्ताविकेने झाली.

कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट सुहास ज्ञानदेव कदम यांनी प्रदीप दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट करणारे प्रभावी भाषण केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रमेश आव्हाड यांनी केले.

सदर उपक्रमास तारापूर गावचे प्रगतशील बागायतदार सज्जन नाना भोसले, शिवसेनेचे तुंगत गटप्रमुख श्री नागनाथ भाऊ देडगे, सज्जन आवताडे, श्री रणजीत माने, सागर देवकर, माजी सरपंच श्री समाधान शिंदे, विजय उंबरकर, सचिन माने, नितीन देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली असून मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर दिसून आली.
