वंचित बहुजन आघाडीचा दणका;श्रीगोंद्यात ‘रास्ता रोको’

वंचित बहुजन आघाडीचा दणका; श्रीगोंद्यात ‘रास्ता रोको’ आंदोलनानंतर महावितरण नरमले, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

 

…………………………………….
श्रीगोंदा तालुका /प्रतिनिधी श्री अनिल बाळासाहेब पठारे
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी, म्हणजेच शेतीला दिवसा वीज मिळावी या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने आज पिंपरी चौफुला (शिरूर-श्रीगोंदा रोड) येथे भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

 

 

वंचितच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महावितरण प्रशासना ने, पुढील २५ दिवसांत शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा देणार असे पत्र वंचित बहुजन आघाडी ला देण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मा. ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी सरकारवर प्रहार केला. ते म्हणाले की, “सरकारने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. रात्रीच्या वेळी वीज दिल्याने सर्पदंश आणि बिबट्याच्या दहशतीमुळे अनेक निष्पाप शेतकऱ्यांचा बळी जात आहे. कारखानदार आणि एमआयडीसीला चोवीस तास वीज असू शकते, मग जगाच्या पोशिंद्याला दिवसा वीज का नाही? हा कोणता न्याय आहे?

 

जोपर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील.”
आंदोलनाची तीव्रता पाहून महावितरणचे अधिकारी तायडे साहेब यांनी आंदोलकांशी चर्चा केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पातळीवर हा विषय मांडून पुढील २५ दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी

 

 

आश्वासन दिले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी PSI सोनवलकर साहेब यांनी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
या भव्य आंदोलनाचे यशस्वी नियोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष जौंजाळ यांनी केले. त्यांना तालुका महासचिव महेश रविंद्र पवार, सोमनाथ वंजारी व गौतम शिंदे यांनी नियोजनात मोलाची साथ दिली.

 

 

यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रामुख्याने जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, युवक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाणे, जिल्हा परिषद माजी सदस्य अनिल वीर, कु स साखर कारखाना माजी संचालक मा श्री बाळासाहेब पठारे, तालुका महासचिव महेश रविंद्र पवार, तालुका उपाध्यक्ष सुरज घोडके व गणेश फाजगे,

 

 

 

तालुका संघटक रावसाहेब म्हस्के, माजी युवा जिल्हा अध्यक्ष संतोष जठार, प्रहारचे तालुका अध्यक्ष वामन भदे, त्रिदल सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप सांगळे मेजर, शेतकरी नेते बाळासाहेब सातव, भारतीय बौद्ध महासभेचे शांताराम उबाळे, ह. भ. प. धोत्रे महाराज, उद्योजक सचिन कातोरे, सावता हिरवे, ॲड. महेंद्र शिंदे, संतोष भोसले, सोमनाथ पवार, संतोष पठारे व बाळासाहेब सातव उपस्थित होते.

 

आंदोलनात पिंपरी कोलंदरचे उत्तम शिंदे, गौतम शिंदे, राहुल पवार; वडगावचे रावसाहेब म्हस्के, अजय म्हस्के; येळपनाचे महेंद्र थोरात; उक्कगावचे सोमनाथ पवार; रायगव्हाणचे अरुण पठारे, आकाश गायकवाड, अनिल पठारे मानसिगं गायकवाड सतीष जाधव,

 

ढवळगावचे उत्तम शिंदे; कोंडेगव्हाणचे मगर सरपंच, संतोष साळवे; म्हसेचे विजय जौंजाळ, संभाजी फाजगे, रविंद्र जौंजाळ; येरोंडलीचे पप्पू शिंदे, शेळके मेजर आणि लोणीचे सोनवणे दत्तात्रेय, आसाराम काळे, बाळासाहेब पठारे, संतोष देवीकर, लक्ष्मण देवीकर,गोरख भालेकर, भानुदास खेडकर, दिलीप खेडकर, महादेव देवीकर, योगेश देवीकर, दत्ता भोसले, इंद्रभान खेडकर उपस्थित होते यांसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

#संविधानन्यूजRG

#संविधान न्यूज ओल्ड साप्ताईक न्यूज पेपर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!