हज यात्रेनिमित्त ऊस पुरवठा अधिकारी श्री तालिकोटे साहेब यांना तुळजापूर गटातर्फे शुभेच्छा.,

हज यात्रेनिमित्त ऊस पुरवठा अधिकारी श्री तालिकोटे साहेब यांना तुळजापूर गटातर्फे शुभेच्छा.,

 

सोलापूर ,प्रतिनिधी :-दादासाहेब जगताप,संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., कूमटे, सोलापूर येथील शेती खात्यामध्ये ऊस पुरवठा अधिकारी म्हणून सध्या कार्यरत असलेले श्री तालिकोटे साहेब हे पवित्र हज यात्रेसाठी रवाना होत असताना तुळजापूर गटाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

श्री तालिकोटे साहेब यांनी आपल्या कार्यकाळात ऊस पुरवठा व्यवस्था सक्षमपणे राबवित शेतकरी व कारखान्याच्या हितासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ते शेतकरी व सहकाऱ्यांमध्ये विशेष मानाचे स्थान राखून आहेत.

 

 

 

हज यात्रेच्या निमित्ताने त्यांचे उत्तम आरोग्य लाभो व ही पवित्र यात्रा सुखरूप, यशस्वी व मंगलमय पार पडो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *