ऊस उत्पादकांना दिलासा सोलापूर सिद्धेश्वरचा प्रतिटन ३,००१ रुपयांचा दर जाहीर….
मुख्य संपादक :- राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४–२५ या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३,००१ रुपये दर
देण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी दिली.
घोषित ऊस दराची रक्कम तीन हप्त्यांमध्ये अदा करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला हप्ता प्रतिटन २,५०० रुपये तात्काळ देण्यात येईल. दुसरा हप्ता प्रतिटन ३०० रुपये जून महिन्यात अदा करण्यात येणार असून, उर्वरित २०१ रुपये अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी ऊस
उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, असेही काडादी यांनी स्पष्ट केले.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून सर्व भागधारक, सभासद तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर व खात्रीशीर मोबदला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत
असल्याचे त्यांनी सांगितले. जाहीर केलेले सर्व हप्ते ठरावीक कालमर्यादेत अदा करण्यात येणार असल्याने ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील काही वर्षांतील आर्थिक अडचणी व इतर कारणांमुळे ऊस दराची संपूर्ण रक्कम एकाच वेळी देणे शक्य झाले नव्हते. हा अनुभव लक्षात घेऊन यंदा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने ऊस दर अदा करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
