विद्युत तार कोसळल्याने चोघांचा दुर्दैवी मृत्यू….

विद्युत तार कोसळल्याने चोघांचा दुर्दैवी मृत्यू….

सोलापूर प्रतिनिधी :-दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक.

तुळजापूर तालुक्यातील केशेगांव शिवारात घडलेल्या भीषण दुर्घटनेत विजेचा धक्का बसून चार युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही दुर्घटना शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेतात काम सुरू असताना विद्युत प्रवाहित असलेली इलेक्ट्रिक तार अचानक तुटून जमिनीवर कोसळली. त्या तारेच्या संपर्कात आलेल्या चार युवकांना तीव्र विद्युत धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

 

 

 

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

 

 

वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

 

#संविधानन्यूजचैनलपोर्टल

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *