१ जानेवारी २०२६ रोजी जयस्तंभ पेरणे ता हवेली जि पुणे येथे मानवंदना देणेसाठी देशाच्या विविध ठिकाणाहून लोक येत असतात. जयस्तंभ पेरणे येथे लोकांनी मानवंदना दिल्यानंतर काही अनुयायी हे
पुणे प्रतिनिधी बालाजी शिंदे,मौजे वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ महाराज यांचे समाधी स्थळी भेट देवून समाधीचे दर्शन घेत असतात.
जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम हा पुणे ते अहिल्यानगर महामार्ग क्रमांक ६० लगत भिमा नदीच्या तीरावर पार पडतो. सदर कार्यक्रम अनुषंगाने दि.३१.१२.२०२५ रोजी सायं १७.०० वा पासुन ते दि.०१.०१.२०२६ रोजी रात्री २४.०० वा. पर्यंत वाहतुकीच्या मार्गामध्ये मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे, यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि.१९.०५.१९९० चे अधिसुचनेनुसार प्राप्त झालेल्या अधिकाराने मौजे पेरणे ता हवेली जि पुणे येथे दि.०१.०१.२०२६ रोजी जयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाकरीता वाहतुक खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिलेले आहेत.
दिनांक ०१.०१.२०२६ रोजी परिवहन महामंडळाच्या एस.टी बसेस सह जड वाहतुक, माल वाहतुक (ट्रक / टेम्पो) इत्यादी तत्सम वाहनांच्या मार्गामध्ये खालील बदल करण्यात आला आहे.
१) चाकण ते शिक्रापुर व शिक्रापुर ते चाकण अशी दोन्ही बाजुकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करणेत येत आहे.
२) अहिल्यानगर बाजुकडून पुणे मुंबई बाजुकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला,
यवत, हडपसर वामार्गाने येतील.
३) पुणे बाजुकडून अहिल्यानगर बाजुकडे जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर, हडपसर पुणे सोलापुर हायवे रोडने, चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा शिरुर अहिल्यानगर रोड अशी वळविली जातील.

४) सोलापुर रोडवरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, माल वाहतुक (टेम्पो ट्रक) हो वाहने हडपसर, मगरपटटा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील,
५) मुंबई येथून अहिल्यानगर बाजुकडे जाणारी हलके वाहने उदा, कार, जोप, इ. वाहने ही वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगर येथे जातील,
६) मुंबई व ठाणे बाजुकडून अभिवादानासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने मुंबई पुणे हायवे वरुन देहुरोड निगडी-चन्होली आळंदी मरकळ तुळापूर फाटा (लोणीकंद) अशी वळविली जातील.
#संविधानन्यूजRG youtube चॅनल ला सबस्क्राईब करा,
