रक्तदानासोबतच अध्यात्मिक प्रबोधन करणारा सत्संग सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे.

मा.श्री. प्रणव (मालक) परिचारक यांच्या उपस्थितीत मोफत रक्तदान शिबिर व सत्संग सोहळ्याचे आयोजन

 

संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.

 

मा.श्री. प्रणव (मालक) परिचारक यांच्या शुभ उपस्थितीत मोफत रक्तदान शिबिर व सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

सदर कार्यक्रम गुरुवार, दि. 31 डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग परिवार व समस्त ग्रामस्थ तारापूर, ता. पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण हनुमान मंदिर ग्रामपंचायत समोर, तारापूर असे आहे.

 

 

रक्तदानासोबतच अध्यात्मिक प्रबोधन करणारा सत्संग सोहळाही आयोजित करण्यात आला असून, त्यामुळे सामाजिक व आध्यात्मिक एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे.

 

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे परिसरातील तरुण-तरुणींनी व नागरिकांनी या मोफत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

 

 

संविधान न्यूज चैनल पोर्टल,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *