*डिजिटल मिडिया तालुका उपाध्यक्षपदी अमर कांबळे यांची बिनविरोध निवड*
*महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी अमर कांबळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली,अमर कांबळे हे मुळचे पंढरपूर शेजारील खेडेगाव चिंचोली भोसे येथील रहिवासी आहेत,त्यांनी -2013- साला पासून पत्रकार क्षेत्राला सुरुवात केली,
सुरुवात केल्यापासून अनेकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली गेली, गेली बारा वर्षे पत्रकार क्षेत्राचा अभ्यास पाहता व सर्वांना सामावून घेण्याची क्षमता पाहता संघटनेचे राज्याचे प्रमुख राजा माने साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष सतिश सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार नागेश सुतार
, पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रवीण नागणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी जाधव, पंढरपूर तालुका अध्यक्ष नामदेव लकडे, सचिव अजित देशपांडे, सहसचिव दगडू कांबळे, खजिनदार गणेश चंदनशिवे, प्रसिद्ध प्रमुख नवनाथ खिलारे,या सर्व पदाधिकारी यांच्या अनुमतीने तसेच सर्व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना मधील सदस्य यांच्या अनुमतीने
पत्रकार व सुप्रसिद्ध लेखक अमर कांबळे यांची पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली,अमर कांबळे यांची आत्तापर्यंत चार पुस्तके राज्यस्तरीय प्रकाशन झाली आहेत,त्यांचा वाचक वर्ग संपूर्ण भारत देशात लाखो तयार झाला आहे,त्यांचे नुकतेच एक नवीन
सत्यघटनेवर आधारित विद्रोही कादंबरी “गद्दारांची औलाद “प्रकाशन होण्याच्या वाटेवर आहे,त्यांची लेखनाची पकड व पत्रकार क्षेत्रातील अनुभव पाहता बिनविरोध निवड करण्यात आली,त्यांनी आत्तापर्यंत पत्रकार क्षेत्रात अनेक पदावर काम केले आहे,व करत आहेत
,या निवडीवेळी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,त्यांची पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबदल सर्व ग्रामीण भागातून कौतुक केले जात आहे,व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत,*
