रोपळे जिल्हा परिषद गट ,जनतेला तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्ष पुढे येऊ शकतो,”

रोपळे जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीकडून

श्रीमती. रंजना गायकवाड यांचे नाव निश्चित, जनतेतून वाढता पाठिंबा…

 

 

सोलापूर प्रतिनिधी : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक पंढरपूर तालुक्यातील 

 

 

रोपळे जिल्हा परिषद गटासाठी वंचित बहुजन आघाडीकडून तारापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती .रंजना उत्तम गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

बुद्ध वासी. उत्तम दगडू गायकवाड, तारापूर गावचे माजी उपसरपंच, यांच्या त्या पत्नी आहेत. श्रीमती रंजना गायकवाड यांचा रोपळे गटात मोठा जनसंपर्क असून, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागामुळे त्या नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.

 

 

महत्त्वाचे म्हणजे, त्या रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, तारापूर यांच्या सक्रिय सदस्या आहेत. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीच्या कार्यात त्यांचा सहभाग सातत्याने राहिला आहे.

 

 

विशेष म्हणजे, त्यांना ग्रामराजकारणाची भक्कम पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यांचे पती उपसरपंच होते, त्यामुळे जनतेच्या प्रश्नांची जाण, प्रशासनाचा अनुभव आणि नेतृत्वगुण त्यांना कौटुंबिक परंपरेतून लाभले आहेत.

 

 

त्यांच्या नावाची चर्चा रोपळे गटातील सर्व गावांमध्ये होत असून, विविध स्तरांतून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेली भूमिका नागरिकांना आशादायक वाटत आहे.

 

 

दरम्यान, अनेक नागरिकांमध्ये “जनतेला तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी पक्ष पुढे येऊ शकतो,” अशी चर्चा होत असून, त्यामुळे आगामी निवडणुकीत रोपळे गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

एकंदरीत, श्रीमती, रंजना उत्तम गायकवाड यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे रोपळे गटातील निवडणूक अधिक चुरशीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

 

 

#संविधान न्यूज चैनल

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *