सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’

जिल्हास्तरीय ‘सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न..

 

 

सोलापूर ,प्रतिनिधी :- दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल सहसंपादक 

 

 

 

सोलापूर जिल्ह्यात शिक्षक भरती संघटना, जिल्हा सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय ‘सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

 

या कार्यक्रमात अनंत चैतन्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हन्नूर ता. अक्कलकोट येथील सौ. मल्लम्मा काशिनाथ चप्पळगाव यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल ‘सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 

 

मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की,

 

 

शिक्षकांची मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा व गुणवत्तेची जोपासना ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे.

 

 

पुरस्कार स्वीकारताना सौ. मल्लम्मा चप्पळगाव यांनी या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

 

या सोहळ्यास विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *