एम एच- टीईटी 2025 मध्ये शंकर माने यांचे उल्लेखनीय यश…
सोलापूर, प्रतिनिधी :
दादासाहेब जगताप,
संविधान न्यूज चॅनल सहसंपादक
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत मोहोळ तालुक्यातील मौजे आष्टी येथील शंकर अनंत माने यांनी यश संपादन करून परिसराचा गौरव वाढविला आहे.
दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या परीक्षेत त्यांनी 150 पैकी 84 गुण मिळवून 56 टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षक पात्रतेसाठी आवश्यक असलेली किमान टक्केवारी 55% असून, त्यांनी त्यापेक्षा अधिक गुण मिळवत पात्रता प्राप्त केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी शंकर माने यांनी केंद्र सरकारची CTET परीक्षा (दोन्ही पेपर) तसेच SET परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या शंकर माने यांच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून, मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशामुळे शंकर माने यांच्या शिक्षक होण्याच्या स्वप्नाला अधिक बळ मिळाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
