क्षेत्र वडवळ येथे भाजप अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ…
मुख्य संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.
श्री क्षेत्र वडवळ येथील श्री नागनाथ नगरीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला मा. आ. राजनजी (मालक) पाटील, मा. आ. यशवंत (तात्या) माने, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळराजे राजनजी पाटील तसेच सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमावेळी प्रकाश भाऊ चवरे, दीपक दादा माळी, सज्जन पाटील, देवानंद गुंड, सुशील क्षीरसागर, विकास वाघमारे, सतीश आप्पा काळे, रमेश माने, जाधव सर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार, माता-भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना विकास, पारदर्शक प्रशासन व लोककल्याण या मुद्द्यांवर भर देत भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

#संविधान न्यूज चैनल पोर्टल
