“रांजणी येथे भाजप व मित्रपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ — आमदार प्रशांत परिचारक यांचा सोलापूर जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा फडकावण्याचा निर्धार”
मुख्य संपादक, राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.
पंढरपूर तालुक्यातील मौजे रांजणी येथे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रांजणी येथील श्री महादेव मंदिरात विधिवत पूजन करून या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी आमदार माननीय श्री. प्रशांत मालक परिचारक व आमदार समाधान {दादा } अवताडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी “यावेळी सोलापूर जिल्हा परिषदवर भाजपचा झेंडा उभा करणारच” असा ठाम निर्धार व्यक्त केला.

या कार्यक्रमास चेअरमन कल्याणराव काळे साहेब, पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा नियोजन समितीचे सदस्य प्रा. सुभाषराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती

दिलीप आप्पा घाडगे, संचालक दिलीप अण्णा चव्हाण, व्हॉइस चेअरमन कैलास खुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीष दादा गायकवाड, अरुण तात्या घोलप, प्रशांत भैया देशमुख, लक्ष्मण तात्या धनवडे यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील विविध पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सविधान न्यूज चैनल व पोर्टल
