माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे पंढरपुरात आगमन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कडून भव्य स्वागत…
.
भारताचे माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ नेते एच. डी. देवगौडा यांच्या पंढरपूर शहरात आगमनप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष कीर्तिपाल सर्वगोड यांनी पुष्पगुच्छ देऊन देवगौडा यांचे मनःपूर्वक स्वागत केले.
यावेळी देवगौडा यांच्या कार्याचा गौरव करताना कीर्तिपाल सर्वगोड यांनी त्यांच्या राजकीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक न्याय, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्वागत कार्यक्रमामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रसंगाचे साक्षीदार बनले.
#संविधान न्यूज चैनल पोर्टल
