भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मा. आ. प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर तालुक्यात दौरा..
मुख्य संपादक राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल.
पंढरपूर तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मा. आमदार प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.
हा प्रचार दौरा मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडणार असून तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
▪ सकाळी ९.०० – मारुती मंदिर, टिळवणगाव
▪ सकाळी १०.०० – छत्रपती शिवाजी महाराज चौक, खरसोळी
▪ सकाळी ११.०० – ग्रामपंचायत समोर, पोहरगाव
▪ दुपारी १२.०० – मारुती मंदिर, विटे
▪ सायंकाळी ४.०० – मारुती मंदिर समोर, आंबेचिंचोली
▪ सायंकाळी ६.०० – अंबिका मंदिर समोर, शंकरगाव
▪ सायंकाळी ७.०० – श्रीराम मंदिर, पुळुंजवाडी
▪ रात्री ८.०० – लिंगेश्वर मंदिर समोर, पुळुंज
या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. भाजपा व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

परंतु तारापूर व मगरवाडीला वगळल्याचा आरोप : भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मा. आ. प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर तालुक्यात दौरा
पंढरपूर तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी मा. आमदार प्रशांत परिचारक यांचा पंढरपूर तालुक्यात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.
हा प्रचार दौरा मंगळवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडणार असून तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. मात्र या दौऱ्याच्या यादीतून तारापूर व मगरवाडी ही दोन महत्त्वाची गावे जाणून-बुजून वगळण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
या दौऱ्याच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. मात्र तारापूर व मगरवाडी या गावांना दौऱ्यात स्थान न दिल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, या गावांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
#संविधान न्यूज चैनल व पोर्टल
