अपक्ष उमेदवार गणेश चंदनशिवे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलली; इतर पक्षांचे धाबे दणाणले
राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल संपादक
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 35-टाकळी निवडणूक विभागातील 2026 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गणेश आबासो चंदनशिवे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक रिंगणात त्यांनी दमदार प्रवेश केल्याने प्रस्थापित पक्षांसह इतर उमेदवारांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे.

नमुना-16 (नियम 22 व 21) नुसार प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांच्या यादीत एकूण 9 उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध पक्षांचे तसेच अपक्ष उमेदवार आपापल्या चिन्हांसह मतदारांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र अपक्ष उमेदवार गणेश चंदनशिवे यांना मिळालेले विजेरी (टॉर्च) हे चिन्ह मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे :
भालचंद्र यल्लाप्पा कांबळे – गादेगाव (हत्ती)
दिपक जालिंदर चंदनशिवे – तिसंगी, सोनके (धनुष्यबाण)
नंदकुमार कोंडीबा वाघमारे – टाकळी (ल.), कोर्टी (कमळ)
कांबळे तानाजी गोविंद – टाकळी (ऑटो रिक्षा)
चंदनशिवे सत्यवान शिवाजी – लक्ष्मी टाकळी (गॅस सिलेंडर)
दत्तात्रय भगवान होवाळ – कोर्टी (नारळ)
वैभव शशीकांत कांबळे – लक्ष्मी टाकळी (रोड रोलर)
गणेश आबासो चंदनशिवे – लक्ष्मी टाकळी (विजेरी/टॉर्च)
मल्हारी श्रीधर फाळके – बोहाळी
ग्रामस्थांमध्ये अपक्ष उमेदवार गणेश चंदनशिवे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, 35-टाकळी निवडणूक विभागातील ही निवडणूक जिल्ह्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत
