सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य शिबिर; शेती खात्याच्या स्टाफच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी
सोलापूर ,प्रतिनिधी — दादासाहेब जगताप,सहसंपादक संविधान न्यूज पोर्टल चैनल.
श्री. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लि., कुमठे, सोलापूर यांच्या कार्यस्थळी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर यांच्या वतीने ऊसतोड कामगारांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम शेती खात्यातील स्टाफच्या मोलाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

या आरोग्य शिबिरामध्ये ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली तसेच आरोग्याची काळजी, स्वच्छता, आजार प्रतिबंध, पोषण आहार आणि कुटुंब नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कामगारांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
यावेळी कारखान्याचे शेतकी विभागातील वरिष्ठ अधिकारी श्री. काशिनाथ पाटील साहेब केन मॅनेजर श्री. शिवशरण साहेब, शेतकी अधिकारी श्री. हणमत बिराजदार साहेब, टाईम ऑफिस विभागातील श्री. तोडकरी साहेब, आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच शेती खात्यातील स्टाफ आणि मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.
कारखाना व्यवस्थापन, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि शेती खात्यातील स्टाफ यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. ऊसतोड कामगारांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

#संविधान न्यूज चैनल व पोर्टल
