सुभाष माने यांचे विरोधकांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन; ईश्वर वठारमध्ये भाजप–रिपाइंचा प्रचार दौरा
: राम गायकवाड मुख्य संपादक, संविधान न्यूज चॅनल
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) व मित्र पक्षांच्या वतीने रोपळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ. ताई वामन वनसाळे तसेच सुस्ते पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. जोशना विशाल फडतरे यांच्या प्रचारार्थ भव्य गावभेट दौरा संपन्न झाला.
या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन तथा युवा नेते सन्माननीय रणजितसिंह (भैय्या) बबनराव शिंदे यांनी केले. यावेळी पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी
सभापती ॲड. वामनराव माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. सुभाषराव माने, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पोपट मामा चव्हाण, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सदस्य महेश नाना कदम, माढा पंचायत समितीचे उपसभापती ढवळे साहेब, देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय घाडगे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा. सुभाषराव माने यांनी भाजप–रिपाइं युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. “विकासाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी मतदारांना केले.
या कार्यक्रमास ईश्वर वठार परिसरातील मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दर्शविला. प्रचार दौऱ्यामुळे परिसरात निवडणुकीची वातावरण तापले असून भाजप–रिपाइं युतीच्या उमेदवारांचा प्रचार अधिक वेगाने पुढे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

