कोरवलीत राजशेखर पाटील यांच्या मुलगा व पुतण्याच्या विवाहास राजकीय-सामाजिक मान्यवरांची उपस्थिती…
सोलापूर , प्रतिनिधी : – दादासाहेब जगताप ,संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे कोरवली येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. राजशेखर पाटील यांच्या मुलाच्या व पुतण्याच्या विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या मंगल प्रसंगी तालुका व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नववधू-वरास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या विवाह सोहळ्यास मा. आ. श्री. यशवंत (तात्या) माने, आ. श्री. रणजितसिंह मोहिते पाटील, सिनेट सदस्य श्री. अजिंक्यराणा पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्री. सचिन जाधव, पंचायत समिती सदस्य श्री. अस्लम चौधरी, श्री. अंकुश अवताडे, श्री. सुशील क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या सोहळ्यास सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पाटील साहेब (कॅन मॅनेजर), तसेच हिप्परगे साहेब (चिफ अकाउंटंट), शेती खात्याचे स्टाफ, शेतकरी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय विवाह कार्यक्रमासाठी ट्रक-ट्रॅक्टर वाहन मालक, टोळी मुकादम, हार्वेस्टिंगचे मालक हेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व नेते, पदाधिकारी व मान्यवरांनी नवदाम्पत्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सुखी, समृद्ध व यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभाशीर्वाद दिले.
विवाह सोहळ्यात नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाह सोहळा अतिशय उत्साहात आणि मंगल वातावरणात पार पडला.
