जि.प. प्राथमिक शाळा अंकोली येथे ‘बाल आनंद बाजार’ उपक्रम उत्साहात संपन्न
सोलापूर (ता. मोहोळ) : प्रतिनिधी – दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक.
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकोली (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथे आज ‘बाल आनंद बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अंकोली गावाची लोकसंख्या साधारण पाच ते सात हजार असून, या उपक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, विक्री-कौशल्य, स्वावलंबन, आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने शाळेच्या परिसरात ‘बाल आनंद बाजार’ उभारण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची दुकाने लावून प्रत्यक्ष बाजार व्यवहाराचा अनुभव घेतला. यामध्ये खरेदी-विक्रीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
या कार्यक्रमावेळी जितेंद्र कामतकर, शिक्षक शेख एफ.बी., समाधान गोवर्धनकर गुरूजी, बोदर गुरूजी, अर्चना अंकोलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पालक गणेश पवार, भैय्या भालेराव, माऊली डोके, अशोक (नाना) पवार, रवींद्र पवार, विकास भोसले, किशोर पवार (ड्रायव्हर) यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

शाळा ही भैरवनाथ मंदिरासमोर असल्याने या उपक्रमानिमित्त अनेक पालकांनी देवदर्शनासह शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक आनंद मिळाला आणि बाजारात चांगली उलाढाल झाली.
अंकोली हे सोलापूर जिल्ह्यातील नावाजलेले गाव असून, भैरवनाथ देवस्थान हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘बाल आनंद बाजार’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
@संविधान न्यूज चैनल व पोर्टल You tube channel
@जिल्हा परिषद शाळा अंकोली केंद्र
तालुका मोहोळ
जिल्हा सोलापूर
