शेज बाभूळगांव येथील हे महादेव मंदिर जुन्या काळापासून श्रद्धेचे केंद्र मानले जाते.

महाशिवरात्रीनिमित्त शेज बाभूळगांव येथील महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी; परिसर भक्तिमय…

मुख्य संपादक:- राम गायकवाड संविधान न्यूज चॅनल व पोर्टल. 

महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मोहोळ तालुक्यातील अंकोली गावाच्या शेजारी असलेल्या शेज बाभूळगांव येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत दर्शन व अभिषेक पूजेस सुरुवात केली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात शिवभक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.

या धार्मिक कार्यक्रमात शिवभक्त मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य पुजारी मनमत स्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा-अभिषेक पार पडला.

यावेळी अभिषेक मधुकर कापसे, निखिल कापसे, बसवेश्वर पाटील, शरणाप्पा गाढवे, युवराज पाटील, शिवराज पाटील, संतोष म्हमाने, तात्यासाहेब गवळी, आण्णा माळी, नंदू माळी (वायरमेन), हरीदास भंडारे, तसेच शेज बाभूळगावचे पोलीस पाटील विलास पाटील हेही दर्शनासाठी उपस्थित होते.

तसेच अंकोलीतील व शेज बाभुळगांव समस्त गावकरी, परिसरातील अनेक शिवभक्त, तसेच पोलिस क्राईम नामा न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक व संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक, मोहोळ शहर व ग्रामीण पत्रकार संघटना खजिनदार श्री दादासाहेब जगताप (अंकोली) हेही मंदिरात दर्शनासाठी हजर होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

गावाचा भौगोलिक व सामाजिक महत्त्वपूर्ण ठसा

शेज बाभूळगांव हे अंकोली गावाच्या शेजारी असून हे गाव मंदिर कॉलेज – उजनी वसाहत जाणाऱ्या रस्त्यावर, तसेच मोहोळ ते शेज बाभूळगाव – अंकोली चौक मार्गावर स्थित आहे. याचबरोबर पंढरपूर–सोलापूर ति-हे मार्गाचा मध्यबिंदू म्हणूनही या गावाची ओळख आहे. त्यामुळे विविध ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांसाठी हे गाव सहज पोहोचण्यासारखे आणि सोयीचे ठिकाण ठरते.

स्थानिक पातळीवर हे गाव “अंकोली-शेज बाभूळगांव” म्हणूनही प्रसिद्ध असून येथील वातावरण रम्य, शांत व प्रसन्न आहे. तसेच शैक्षणिक दृष्ट्यानेही या परिसराचा विकास चांगला असून विद्यार्थ्यांसाठी व कुटुंबांसाठी हे गाव अत्यंत अनुकूल मानले जाते.

 

महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे गावात उत्साह, भक्ती आणि एकात्मतेचे सुंदर चित्र दिसून आले.

 

 

 

 

मंदिराचा इतिहास – थोडक्यात माहिती

शेज बाभूळगांव येथील हे महादेव मंदिर जुन्या काळापासून श्रद्धेचे केंद्र मानले जाते. स्थानिकांच्या सांगण्यानुसार हे मंदिर शिवकालीन रूपांतर झालेले असून, पूर्वीच्या काळातील काही वास्तुरचनात्मक वैशिष्ट्ये आजही मंदिर परिसरात जाणवतात. अनेक पिढ्यांपासून या मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी अभिषेक, पूजा, दर्शन व भक्तीचा सोहळा परंपरेने सुरू आहे.

यूट्यूब@संविधानन्यूजRG

पोर्टल, sanvidhannews.com

#mahashivratrasejbhabhulgav

#mohol

#solapur

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!