अंकोलीत १ कोटी १० लाखांच्या ‘श्री भैरवनाथ भक्त निवास’चे लोकार्पण; भाविकांसाठी आधुनिक सोयी-सुविधांचा नवा अध्याय …
सोलापूर प्रतिनिधी : दादासाहेब जगताप संविधान न्यूज चॅनल व पोर्टल सहसंपादक
अंकोली (ता. मोहोळ) येथे ग्रामदैवताच्या साक्षीने आणि छत्रपतींच्या प्रेरणेने एक ऐतिहासिक क्षण साकारला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.
तत्कालीन मा.आमदार यशवंत (तात्या) माने यांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे रु. १ कोटी १० लाख निधीतून उभारण्यात आलेल्या ‘श्री भैरवनाथ भक्त निवास’ या भव्य वास्तूचे लोकार्पण मा. आ. राजनजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. आ. यशवंत (तात्या) माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या भक्त निवासामुळे भैरवनाथ देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज व सुरक्षित निवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. भक्त निवासामध्ये सर्व भाविकांसाठी पाण्याची उत्तम सोय, अखंडित लाईट व्यवस्था तसेच स्वच्छ व सुरक्षित निवासाची चांगली सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून अंकोली गावाच्या धार्मिक व सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
अंकोली हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव असून परिसरात ऊस उत्पादक शेतकरी व लिंबू बागायतदार मोठ्या प्रमाणात आहेत. गावामध्ये सरकारी दवाखाना व पशुवैद्यकीय दवाखाना अशा सर्व मूलभूत सोयी उपलब्ध असल्यामुळे अंकोली हे सर्वांगसुंदर व सुविधायुक्त गाव म्हणून ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यात ‘भैरवनाथ अंकोली’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गावाची ओळख धार्मिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रात ठळक आहे.
यावेळी जेष्ठ बाबासाहेब (तात्या) क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य श्री अस्लम चौधरी, सदस्या सौ. अमेरिका कापसे, रामदास चवरे, माऊली पवार, भगवान पवार गुरुजी,तुळशीराम पवार गुरूजी, काकासाहेब पाटील, तानाजी पवार, शिवाजी सोनवणे सर, सुनिल चव्हाण, हिम्मत पाटील, सरपंच पांडुरंग येळवे, संदीप (काका ) पवार, प्रशांत बचूटे, शिवराज पाटील, , महेश पवार, विशाल पाटील, विकास पवार, सिराज तांबोळी, सचिन पाटील (कृषीउत्पन्न), सागर जगताप, रविराज पवार, धनसिंग पवार, विजयसिंह पवार, संग्रामसिंग पवार, भैरवनाथ भोसले, B.G.P हाँटेल मालक बाबासाहेब पवार , संभाजी डोके, किशोर क्षीरसागर प्रवीण क्षीरसागर, सोमनाथ पवार, अनिल पवार मेंबर, सचिन पवार, पांडुरंग भोसले, दत्तात्रय कामतकर साहेब, आप्पा पवार, दादासाहेब पवार सचिव, नाना पवार, दिग्विजय जगताप,घाडगे गुरुजी आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ देवस्थान, जिल्हा प्राथमिक शाळा, भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी व शिक्षकवृंद, अंकोली पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालक तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून केवळ दर्शनासाठी आलेले तमाम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तालुक्यातील माजी आमदार व त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अंकोली ग्रामस्थांच्या एकजुटीने उभारलेले हे भक्त निवास भाविकांसाठी एक आदर्श सुविधा केंद्र ठरणार असून गावाच्या धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीस नवे बळ देणार आहे.
@संविधान न्यूज चैनल
@मुख्य संपादक राम गायकवाड
@महाराष्ट्र राज्य
मोहोळ विधानसभा मतदारसंघात माजी आमदार यशवंत माने
लोकार्पण सोहळा
