पुळुज गावातील शारदानगर येथे चारा पाण्याविना लहान गाईची एकूण 13 वासरे,

पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण 13 गायीच्या लहान वासरांना जीवनदान दिले

मुख्य संपादक राम गायकवाड 

यात घटना अशी आहे की दिनांक 20 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास गोरक्ष श्री घाटे व मानस परिचारक यांनी फोन द्वारे माहिती दिली की पुळुज गावातील शारदानगर येथे चारा पाण्याविना लहान गाईची एकूण 13 वासरे एका जाळीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आहेत

 

 

व काही वेळाने ती खाटकाकडे घेऊन जाणार आहेत अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री टी वाय मुजावर यांना मिळताच त्यांनी तात्काळ सदरची माहिती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकासह पुळुज येथे कारवाई केली असता एका झाडाखाली एकूण लहान-मोठ्या आकाराची 13 गायींची वासरे बांधलेले आढळली त्यांना चारा पाणी वगैरे काहीही सोय त्या ठिकाणी केलेली नव्हती सदरची जनावरे क्रूरपणे बांधून ठेवलेल्या अवस्थेत होती व खाटकाकडे कत्तलीसाठी देण्याच्या तयारीत असताना व ती जनावरे गंगाराम साहेबराव वाघमोडे राहणार पुळूज व्यक्तीने बांधून ठेवण्याचे निष्पन्न झाले सदर व्यक्तीने ती जनावरे खटकाकडे द्यायच्या अगोदरच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून एकूण 13 गायीच्या वासरांचे प्राण वाचवले याबाबत गोरक्षक मानस माधव परिचारक राहणार पंढरपूर यांनी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गंगाराम साहेबराव वाघमोडे यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दतीने क्रूरपणे वागणूक देणे या कायद्याअंतर्गत तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कारवाईचे सर्व नागरिकांमध्ये कौतुक होत आहे पोलिसांनी 13 गायीच्या लहान वासरांना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा केले आहे

 

 

 

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले सहाय्यक फौजदार विजू गायकवाड पोलीस हवालदार दीपक भोसले सुहास देशमुख मंगेश रोकडे संजय गुटाळ सागर गवळी विजयकुमार आवटी अभिमन्यू गरड चालक हसन नदाफ यांच्या पथकाने केली आहे.

 

Youtube@संविधानन्यूजRG

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *