संभाजी ब्रिगेड,पंढरपूर शहराध्यक्षपदी दीपक वाडदेकर यांची निवड; कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

पंढरपूर शहराध्यक्षपदी दीपक वाडदेकर यांची निवड; कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत

अंकोली, प्रतिनिधी : दादासाहेब जगताप (संविधान न्यूज चॅनल व पोर्टल, सहसंपादक)

पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री. दीपक दादा वाडदेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे स्थानिक राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या निवडीच्या निमित्ताने भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोलीचे प्राचार्य श्री. जाधव के. के. सर तसेच मराठा सेवा संघाचे श्री. सतीश रकटे साहेब यांच्या हस्ते वाडदेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात वाडदेकर यांचे स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वाडदेकर यांच्या निवडीमुळे पंढरपूर शहरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना श्री. वाडदेकर यांनी सर्वांचे आभार मानत, पक्षाच्या विचारधारेनुसार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पंढरपूर शहरातील विकासकामे गतीमान करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!