वालचंद नगर,जंक्शन_ कळस रोडच्या बाजूला गोल्फ मैदानामध्ये एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आले

इंदापूर प्रतिनिधी विठ्ठल काळे:वालचंद नगर दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी भरणेवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये जंक्शन_ कळस रोडच्या पूर्व बाजूला साधारण 200 फूट अंतरावरील गोल्फ मैदानामध्ये एका अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळून आलेले असून अद्याप पर्यंत त्याची ओळख पटली नाही. सदर

 

व्यक्तीचे वय वर्ष अंदाजे 45 ते 55 वर्ष असल्याचे दिसून येत आहे. आपल्या संपर्कातील अथवा माहिती मधील कोणती व्यक्ती बेपत्ता असल्यास वालचंद नगर पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा अथवा माहिती द्यावी असे आव्हान वालचंद नगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे साहेब 8605022022.  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *