पंढरपूर:श्रीपुर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणी स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार असून सर्व शेतकरी सभासद कार्यकर्ते तसेच स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक प्रेमी हे उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्राला लाभलेले विठ्ठलाच्या नगरीत संत म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी शेतकरी कष्टकरी तसेच कामगार यांच्या कल्याणकारी व त्यांच्या आर्थिक परिस्थिती

सुधारण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपले कार्य केले प्रत्येक कुटुंबाचे कल्याण केले आर्थिक डबघाईला आलेले साखर कारखाने आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी त्यांनी राबवलेली काटकसरीने मोहीम ही संपूर्ण महाराष्ट्रभर नावे दिली गेली सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन खाते ते मंडळाचे अध्यक्ष असताना एसटी महामंडळ डबघाईला आलेले असताना एसटी महामंडळ फायद्यात आणण्याचे काम केले स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी अशा मानव रुपी ईश्वर अवताराला कोणी संत कोणी तर कोणी दीनदलित महाराष्ट्राचे कैवारी अशी ओळख निर्माण झाली अशा तर महान पंथ कोणी मालक म्हणू लागले अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचे अनावरण उद्या दिनांक15/10/2025 रोजी शिरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.
