शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते दृढ ठेवत ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार – चेअरमन अनिल सावंत

भैरवनाथ शुगरचा १२ वा गळीत हंगाम उत्साहात प्रारंभ..

 

सोलापूर मोहोळ/ प्रतिनिधी:- श्री दादासाहेब जगताप, संविधान न्यूज चॅनल सह. संपादक मंगळवेढा तालुक्यातील सुप्रसिध्द,

शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते दृढ ठेवत ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार – चेअरमन अनिल सावंत भैरवनाथ शुगर इंडस्ट्रीज, लवंगी या प्रगत साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात आणि पारंपरिक विधीपूर्वक पार पडला. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन मा. अनिल सावंत यांच्या हस्ते बॉयलरला अग्नी प्रदीपन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला व्हा. चेअरमन मा. केशव सावंत, संचालक मंडळातील सदस्य, श्री साहेबराव दत्तात्रय पवार {सर} मरवडे कारखान्याचे शेती अधिकारी श्री लोंढे साहेब व श्री चव्हाण साहेब, अमोल माळी ऊस पुरवठा अधिकारी, श्री नागणे साहेब वसूली अधिकारी, धनंजय पासले फायनल मॅनेजर, सुहास जाधव साहेब,राहूल हजारे RM मंगळवेढा, श्री ढगे साहेब वरिष्ठ अधिकारी,कामगार वर्ग वहान मालक व ऊस तोडणी ठेकेदार अरूण पवार अंकोली परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सुधीर बसाटे वरकूटे मान्यवर उपस्थित होते.

चेअरमन अनिल सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

“भैरवनाथ शुगरने गेल्या ११ हंगामांमध्ये प्रगतीचा इतिहास घडविला आहे. या वर्षी कारखान्याचे ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य आम्ही ठरविले असून ते पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आणि सहकार्य आमचे सर्वात मोठे बळ आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, कारखान्याच्या विकासात कामगार, अधिकारी आणि सभासदांचा मोलाचा वाटा आहे. या हंगामात अधिक उत्पादनक्षमतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून ऊस तोडणी, वाहतूक आणि गाळपासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भैरवनाथ शुगरच्या कामगिरीचे कौतुक करत शेतकरीहिताचे धोरण कायम ठेवण्याचे आवाहन केले. कारखान्याच्या परिसरात या हंगामाच्या प्रारंभाने सणासारखा उत्साह पाहायला मिळाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *