सर्व्हर बंदमुळे KYC प्रक्रियेत अडथळा; शेतकऱ्यांना आधार लिंकच्या आधारे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, सोलापूर खासदार प्रणिती शिंदे

 

 

सोलापूर प्रतिनिधी: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात KYC प्रक्रियेमुळे अडथळा येत असल्याने खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आधार लिंकच्या आधारे नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.

 

या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की, सोलापूर जिल्ह्यामध्ये सन २०२५ सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे आलेल्या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे तसेच निवारा व्यवस्थेचे अतोनात नुकसान झालेले असून त्यांना अनेक समस्यांना व अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सदर शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरीकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा होण्यासाठी KYC करण्यास सांगण्यात येत आहे. परंतू मागील दोन ते चार दिवसापासून सर्व्हर बंद असल्यामुळे त्यांचे KYC होऊ शकत नाही. तरी ही KYC ची प्रक्रिया न करता आधार लिंकप्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास्तव सुचना व्हाव्यात. पुढील आठवड्‌यात दिवाळीच्या सुट्टी आहे या कालावधी मध्ये बँका बंद राहणार आहेत. तरी सणासुदींच्या अगोदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणे आवश्यक आहे.

 

तरी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरीकांना नुकसान भरपाईची रक्कम KYC प्रक्रियेला विलंब लागत असल्यामुळे आधार लिंकच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरीता संबंधितांना आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *